गोहोगाव रस्त्यावरील क्षतिग्रस्त पुलाची आमदारांकडुन पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 14:50 IST2018-07-31T14:50:11+5:302018-07-31T14:50:53+5:30
वाकद - गोहोगाव रस्त्यावर असलेल्या पूल तीन वर्षापासुन तुटल्याने येथील बससेवा बंद आहे. परिणामी जनतेला गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची माहिती गावकºयांनी आमदार अमित झनक यांना दिल्यानंतर त्यांनी या पुलाची पाहणी केली.

गोहोगाव रस्त्यावरील क्षतिग्रस्त पुलाची आमदारांकडुन पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाकद : वाकद - गोहोगाव रस्त्यावर असलेल्या पूल तीन वर्षापासुन क्षतिग्रस्त असल्याने येथील बससेवा बंद आहे. परिणामी जनतेला गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची माहिती गावकºयांनी आमदार अमित झनक यांना दिल्यानंतर त्यांनी या पुलाची पाहणी केली. संबतिधत अधिकाºयांना भेटुन लवकरच पुलाची दुरुस्ती केल्या जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
गोहोगाव येथील ५० ते ६० विद्यार्थी वाकद येथे शिक्षणासाठी येतात तर काही विद्यार्थी शिक्षणासाठी रिसोड येथे जातात. बस बंद अभावी विद्यार्थ्यांसहच ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांची समस्या पाहता आमदार अमित झनक यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन लवकरच जि.प.अध्यक्ष हर्षदा देशमुख, बांधकाम सभापती चंद्रकांत ठाकरे यांना भेटुन लवकरच याची दुुरुस्ती केल्या जाईल असे सांगितले. यावेळी बबनराव गारडे, प्रशांत हाडे, दत्तराव हाडे, पंजाबराव हाडे, विनोद गारडे, प्रशांत हाडे, दत्तरव हाडे, पंजाबराव हाडे, विनोद हाडे,गजानन हाडे, चंद्रकांत हाडे, प्रकाश पाटील ,ओम हाडे ,राजु घायाळ आदिंची उपस्थिती होती.