मुरूमाचा भराव न टाकल्याने नव्या रस्त्याची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:46 IST2021-08-21T04:46:50+5:302021-08-21T04:46:50+5:30

सुरकंडी, फाळेगाव, मोहगव्हाण, धुमका या गावांकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली होती. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दखल ...

The misery of the new road due to not filling the pimple | मुरूमाचा भराव न टाकल्याने नव्या रस्त्याची दैना

मुरूमाचा भराव न टाकल्याने नव्या रस्त्याची दैना

सुरकंडी, फाळेगाव, मोहगव्हाण, धुमका या गावांकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली होती. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दखल घेऊन २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातून केवळ ३०० मीटर रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले. हे काम पूर्ण होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. रस्त्याचे काम जिथपर्यंत करण्यात आले, तिथपर्यंत मुरूमाचा भराव टाकून जुना आणि नवीन रस्ता व्यवस्थित करण्याची गरज होती. परंतु संबंधित कंत्राटदाराने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, एका ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला. पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यातून दुचाकी वाहने बाहेर काढणेही कठीण होत आहे. या समस्येकडे जि. प. बांधकाम विभागाने वेळीच लक्ष पुरवून रस्ता दुरूस्तीसह नव्या रस्त्याच्या कडेला मुरूमाचा भराव टाकावा, अशी मागणी होत आहे.

..............

दुचाकी वाहनास अपघात

१८ ऑगस्ट रोजी शेतकरी बाबूभैय्या ठाकूर यांच्या दुचाकी वाहनास रस्ता नादुरूस्त झाल्याने अपघात झाला. मातीमिश्रीत मुरूमाचा ढीग रचून ठेवल्याने अशा स्वरूपातील घटनांमध्ये हल्ली वाढ झालेली आहे.

Web Title: The misery of the new road due to not filling the pimple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.