शिरपुरातील रस्त्याची दयनीय अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:46 IST2021-08-12T04:46:55+5:302021-08-12T04:46:55+5:30

शिरपूर जैन येथील वाॅर्ड नंबर दोनमधील एका रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्या नसल्याने या रस्त्यावर ...

The miserable condition of the road in Shirpur | शिरपुरातील रस्त्याची दयनीय अवस्था

शिरपुरातील रस्त्याची दयनीय अवस्था

शिरपूर जैन येथील वाॅर्ड नंबर दोनमधील एका रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्या नसल्याने या रस्त्यावर सतत पाणी वाहत आहे. याचा स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवासी आक्रमक झाले आहेत. वाॅर्डमधील सदस्यांना वेळोवेळी याकडे लक्ष देण्यासाठी विनंती करण्यात येऊनही या समस्येकडे वाॅर्डातील सदस्यांचा नाकर्तेपणामुळे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रहिवाशांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन १४ ऑगस्टपर्यंत या रस्त्या दुरुस्ती व नालीचे काम करण्यात यावे. अन्यथा ग्रामपंचायत प्रांगणात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर इब्राहिम कालेपिरवे, रन्नू रेघीवाले, पिरू कालेपिरवे, इस्माईल कालेपिरवे, इमाम कालेपिरवे, रननु रेघीवाले, मदार रेघीवाले, इमाम कालेपिरवे, शब्बीर कालेपिरवे, जुममा रेघीवाले यांच्यासह २५ जणांच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: The miserable condition of the road in Shirpur