अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

By Admin | Updated: May 29, 2017 00:54 IST2017-05-29T00:54:57+5:302017-05-29T00:54:57+5:30

उंबर्डाबाजार (जि. वाशिम) : परिसरातील दुधोरा येथील अल्प भूधारक शेतकरी वामन भगवान ढोकणे (७९) या शेतकऱ्याने २८ मे रोजी शेतातील उंबराच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

Minority Farmer Suicide | अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
उंबर्डाबाजार (जि. वाशिम) : परिसरातील दुधोरा येथील अल्प भूधारक शेतकरी वामन भगवान ढोकणे (७९) या शेतकऱ्याने २८ मे रोजी शेतातील उंबराच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
दुधोरा येथील अल्पभुधारक शेतकरी वामनराव भगवान ढोकणे यांच्याकडे स्वत:च्या मालकीची दोन एकर शेती आहे. त्यांनी २८ मे रोजी शेत सर्व्हे नं ३४/१ मधील विहिरीच्या बाजूला असलेल्या उंबराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतक वामनराव यांचे मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
घटनास्थळाला कारंजा ग्रामीणचे पोलीस उपनिरिक्षक अमर चवरे यांनी भेट दिली. उंबर्डाबाजार पोलीस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Web Title: Minority Farmer Suicide