अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले!
By Admin | Updated: June 2, 2017 01:28 IST2017-06-02T01:28:50+5:302017-06-02T01:28:50+5:30
मालेगाव : शहरातील गांधी नगर परिसरात वास्तव्याला असलेल्या दोन अल्पवयीन मुलींना दोघांनी फूस लावून पळविल्याची घटना ३१ मे रोजी उघडकीस आली.

अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले!
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शहरातील गांधी नगर परिसरात वास्तव्याला असलेल्या दोन अल्पवयीन मुलींना दोघांनी फूस लावून पळविल्याची घटना ३१ मे रोजी उघडकीस आली. यासंदर्भात प्राप्त फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरूद्ध १ जून रोजी गुन्हे दाखल केले.
यासंदर्भात एका महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, तिच्या १७ वर्षाच्या मुलीला रतन चव्हाण याने पळवून नेले; तर दुसऱ्या घटनेत दाखल फिर्यादीत फिर्यादीने नमूद केले आहे, की अनिल अवचार यांचा मेहुना दिनेश याने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले. या दोन्ही वेगवेगळ्या घटनांप्रकरणी दाखल तक्रारींवरून दोन्हीही आरोपींविरूद्ध मालेगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.