अल्पवयिन मुलीचा विनयभंग
By Admin | Updated: June 1, 2017 01:14 IST2017-06-01T01:14:08+5:302017-06-01T01:14:08+5:30
मानोरा - शहरानजिक असलेल्या एका नगरातील अल्पवयिन मुलीचा घरात घुसून विनयभंग केल्याची घटना ३१ मे रोजी घडली.

अल्पवयिन मुलीचा विनयभंग
मानोरा - शहरानजिक असलेल्या एका नगरातील अल्पवयिन मुलीचा घरात घुसून विनयभंग केल्याची घटना ३१ मे रोजी घडली.मानोरा पोलिसांत फिर्यादी मुलीच्या वडिलाच्या तक्रारीनुसार आरोपी विनोद रमेश कवाने वय ३० रा. भायजी नगर सोमठाणा याने ३१ मे रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घरात घुसून मुलीचा विनयभंग केला. आरोपी दारुच्या नशेत असल्याचे तक्रारी म्हटले आहे. यावरुन पोलीसांनी आरोपी विनोद रमेश कवाने यांचेविरुध्द भांदविचे कलम ४५२, ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.