दुष्काळातही लाखोंची ‘धुळवड’!
By Admin | Updated: March 26, 2016 02:24 IST2016-03-26T02:24:13+5:302016-03-26T02:24:13+5:30
रासायनिक रंगांना कमी पसंती; जलमुक्त होळीला प्राधान्य.

दुष्काळातही लाखोंची ‘धुळवड’!
शिखरचंद बागरेचा/वाशिम
धूलिवंदनाच्या दिवशी जिल्हावासियांनी पर्यावरणपूरक रंगांना प्राधान्य दिल्याचे बाजारपेठेतील आकडेवारीवरून दिसून येते. इको फ्रेन्डली रंग व अन्य साहित्याची १२ लाखांच्या आसपास उलाढाल झाल्याचा अंदाज असून, रासायनिक रंगांना ग्राहकांनी पसंती दिली नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
मागील तीन वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे सतत नापिकीला सामोर्या जाणार्या व यावर्षी दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या वाशिम जिल्हय़ातील शौकिनांनी होळी सणानिमित्त रंगात रंगून लाखोंची धुळवड केली. होळी सणाच्या दुसर्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा पुरातन काळापासून सुरू आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होऊन आधुनिकतेची भर पडत आहे. विविध प्रकारच्या रंगांचा वापर करून प्रत्येक जण एकमेकाला रंग लावून ह्यहोळीह्ण साजरी करतो. यावर्षीही दुष्काळाच्या आगीत होरपळलेल्या वाशिम जिल्हय़ात रंगप्रेमींनी लाखो रुपयांचे रंग उधळून धुळवड साजरी केली. काही संघटना यासाठी अपवाद ठरल्या असून, या सामाजिक संघटनांनी जलमुक्त रंगपंचमी साजरी करून एक चांगला संदेश दिला. जिल्हय़ातील वाशिम, मालेगाव, रिसोड, कारंजा, मंगरुळपीर व मानोरा या शहरांसोबत तालुक्यातील व्यावसायिकांनी विविध प्रकारचे रंग, रंग उडविणार्या पिचकार्या, आकर्षक व रंगीन टिपोर्या इत्यादी साहित्यांची तब्बल १२ लाख रुपयांची विक्री केली, असा प्राथमिक अंदाज व्यावसायिकांनी वर्तविला. रंगपंचमीच्या दिवशी जिल्हय़ात सर्वत्र रंग खेळणार्यांमध्ये युवा पिढी अग्रेसर होती. जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती व दुष्काळ वातावरणाचा रंगप्रेमी कुठल्याच प्रकारचा ताण डोक्यावर न घेता रंगपंचमीचा मात्र मनसोक्त आनंद घेतल्याचे दिसून आले. 'ड्रंक अँण्ड ड्राइव्ह'प्रकरणी पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली.