शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

शासकीय दूध शितकरण बंदमुळे दुधाची नासाडी! मातीमोल भावात विक्री, दूध शिल्लक राहत असल्याने नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 16:02 IST

गेल्या ३० वर्षांपासून वाशिम येथे कार्यरत शासकीय दूध शितकरण केंद्र आठ ते दहा महिन्यांपासून बंद असल्याने दुध उत्पादक संस्था व पशुपालकांच्या मोठया प्रमाणात दुधाची नासाडी होत आहे.

शिरपूर- गेल्या ३० वर्षांपासून वाशिम येथे कार्यरत शासकीय दूध शितकरण केंद्र आठ ते दहा महिन्यांपासून बंद असल्याने दुध उत्पादक संस्था व पशुपालकांच्या मोठया प्रमाणात दुधाची नासाडी होत आहे. दुध घेण्यासाठी कोणीच तयार नसल्याने दुधाची काय करावे असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. २६ ऑक्टोंबर रोजी शिरपूर येथे दुध विक्रीसाठी घेवून जाणाऱ्यांना रिकाम्या हातांनी परतावं लागलं. जिल्हाप्रशासनाने याकडे लक्ष देवून शासकीय दूध शितकरण केंद्र सुरु करण्याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी पशुपालकांच्यावतीने होत आहे.

वाशिम येथील शितकरण दूध केंद्र बंद असल्याने पशुपालकांनी गावातील दूध डेअरींवर आपल्याकडील दूध विकणे सुरु केले होते. परंतु दररोज येत असलेल्या मोठया प्रमाणातील दूध साठवण व थंड करणे शक्य होत नसल्याने खरेदीदारांनी दुध न घेण्याचे सांगितले.यामुळे पशुपालक दूध नागरिकांच्या घरोघरी, हॉटेल्स, रेस्टॉरंटवर कमी जास्त भावात विकत आहेत. त्यानंतरही दूध शिल्लक राहत असल्याने मात्र त्यांचे नुकसान होत आहे. शासकीय दूध शीतकरण केंद्राकडे शासनाच्या दुग्धव्यवसाय विकास विभागाने सपशेल पाठ फिरवली असून दूधाचा पुरवठाच होत नसल्याने हे केंद्र गेल्या ८ ते १० महिन्यांपासून बंद पडले आहे. परिणामी, केंद्रातील लाखो रुपयांचे यंत्र व इतर मालमत्ता धूळ खात पडून असल्याचे दिसून येत असल्याचे केंद्रातर्फे सांगण्यात येते तर दुध उत्पादक संस्था शितकरण बंद असल्याचे कारण पुढेकरीत नुकसान होत असल्याचे सांगत आहे. 

नेमकं काय घडलं ?

- गतवर्षीपासून शीतकरण केंद्राला होणारा दुधाचा पुरवठा अचानक कमी झाल्याने व्यवस्थापनावर होणारा खर्च परवडेनासा झाल्याने साधारणत: १० महिन्यांपासून हे दूध शीतकरण केंद्र बंद करण्यात आले आहे. 

- दुध संकलन केंद्रातकार्यरत व्यवस्थापक, दुधसंकलन पर्यवेक्षक, दुध परिचर आदी पदांवरील कर्मचाऱ्यांना अकोला येथील दुध संकलन केंद्राकडे वर्ग करण्यात आले आहे. 

- दुध संकलन केंद्रात जाणारे दूधही संकलन केंद्र बंद झाल्याने डेअरीवर विक्रीस येवू लागले. यामुळे डेअरीवाल्यांकडे दुध साठवण क्षमता पुरेसी नसल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत. यापुढे दूध न आणण्याच्या सूचना दिल्याने दूधाची नासाडी होत आहे.