रस्त्याच्या मधाेमध असलेली कपार देतेय अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:46 IST2021-07-14T04:46:42+5:302021-07-14T04:46:42+5:30

भर जहागीर बसथांब्यावर सिमेंट रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. एका बाजूचा रस्ता पूर्ण केला, तर दुसरी बाजू करताना ...

In the middle of the road, Kapar gives an invitation to an accident | रस्त्याच्या मधाेमध असलेली कपार देतेय अपघाताला निमंत्रण

रस्त्याच्या मधाेमध असलेली कपार देतेय अपघाताला निमंत्रण

भर जहागीर बसथांब्यावर सिमेंट रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. एका बाजूचा रस्ता पूर्ण केला, तर दुसरी बाजू करताना येथील बसथांब्यावर वीस ते तीस फुटांचा रस्ता सिमेंट काँक्रीट करण्यापासून ‘जैसे थे’ ठेवला. विशेष म्हणजे या रत्याची रुंदी जवळपास चाळीस फूट असून दोन्ही बाजूला अंदाजे दोनशे मीटर सिमेंट रस्ता केल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत; परंतु ऐन बसथांब्यावर एका बाजूला तीस बाय वीस फुटांच्या रस्त्याचे काम खोळंबल्याने या रस्त्याला एक ते दीड फुटाची कपार झाल्याने वेगाने येणारी दुचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहनांचा रात्रीच्या वेळी अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर कपार असलेल्या ठिकाणी कुठलीच सूचना, फलक नाही. संबंधित रस्ता निर्माणाधीन कंपनीने किंवा संबंधित विभागाने सदर प्रकाराकडे तत्काळ लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: In the middle of the road, Kapar gives an invitation to an accident