पथनाट्यातून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST2021-03-13T05:15:42+5:302021-03-13T05:15:42+5:30
यावेळी शाहीर निरंजन भगत व विद्या भगत यांनी शाहिरी गीतांमधून मुलींना त्यांचे न्यायीक अधिकार देऊन समान वागणूक देण्यासह उच्चशिक्षण ...

पथनाट्यातून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा संदेश
यावेळी शाहीर निरंजन भगत व विद्या भगत यांनी शाहिरी गीतांमधून मुलींना त्यांचे न्यायीक अधिकार देऊन समान वागणूक देण्यासह उच्चशिक्षण देण्याचे आवाहन पथनाट्यातून केले. ‘कर्तृत्व अन् सामर्थ्याची ओढून घे नवी झालर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर’ या गितातून भावस्पर्शी अभिनय करीत स्त्री-मुक्तीची हाक दिली. पथनाट्यात नालवादक रवि तेलगोटे, खंजेरीवादक अलोकरत्न भगत, प्रताप वानखडे, संजय सुरडकर, तबलावादक विवेक सावंत, बेबी पडघान, यशोदा पडघान, मायावती भगत यांनी अभिनय केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजरत्न संस्थेचे विनोद पट्टेबहादूर, यश कंकाळ, नंदकिशोर वनस्कर, वैशाली खोब्रागडे-मेश्राम, संगिता काळबांडे, मनिषा ठोंबरे, महादेव क्षीरसागर, विकास पट्टेबहादूर, अशांत कोकाटे, वर्षा भगत यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी सम्यक मेश्राम यांनी दिली.