सिकलसेल रुग्णांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 15:19 IST2019-03-02T15:18:43+5:302019-03-02T15:19:45+5:30
वाशिम : सिकेलसेल रुग्णाच्या विविध मागण्या संदर्भात भीम आर्मी एकता मिशनच्यावतिने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

सिकलसेल रुग्णांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सिकेलसेल रुग्णाच्या विविध मागण्या संदर्भात भीम आर्मी एकता मिशनच्यावतिने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात सामान्य रुग्णालय मध्ये ३० बेडची विशेष सिकेलसेल वार्ड ची व्यवस्था करावी जेणेकरून योग्य पद्धतीत उपचार होतील या प्रमुख मागणीसह शासनाने स्वतंत्र सिकेलसेलची यंत्रणा उभी करावी , विनाअट दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे , सिकेलसेल रुग्णाना निशुल्क बससेवा सुरु करण्यात यावी, शासकीय रुग्णालयमध्ये सोलूबीटची तपासणी कीट उपलब्ध करावी यासह विविध मागण्यांचा समावेश आहे. यावेळी भीमआर्मी जिल्हा प्रमुख अॅड.सचिन पट्टेबहादूर , भागवत भालेराव, किशोर खडसे, विजय बाजड, स्वप्नील खडसे, मनोज भदर्गे ,किशोर वाटोरे, जयदेव खडसे ,सचिन भगत ,अरुण भगत , किरण खडसे , वैभव खडसे , उमेश खडसे, स्वप्नील भगत, बंडू भालेराव , संतोष भगत ,संतोष पोलकर, सचिन मैंदकर , मधूकर मैंदकर आदींच्या स्वाक्षºया आहेत.