मेहकरच्या युवकाचा संशयास्पद मृत्यू

By Admin | Updated: August 18, 2014 01:45 IST2014-08-18T01:44:00+5:302014-08-18T01:45:49+5:30

वाशिम ते केकतउमरा लोहमार्गावर मेहकर येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू.

Mehkar's teenage suspicious death | मेहकरच्या युवकाचा संशयास्पद मृत्यू

मेहकरच्या युवकाचा संशयास्पद मृत्यू

वाशिम : वाशिम ते केकतउमरा लोहमार्गावर मेहकर येथील युवकाचा मृतदेह १७ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३0 वाजता आढळून आला. मेहकर येथील गणपती गल्लीमध्ये वास्तव्यास असलेला २५ वर्षीय बागेश गोविंद खवसे याचा मृतदेह एका रेल्वे कर्मचार्‍याला सकाळी ७:३0 वाजतादरम्यान रुळाची तपासणी करताना आढळून आला. यावेळी मृतकाचे धड व मुंडके वेगवेगळय़ा अवस्थेत पडून होते. सदर घटना ही घातपात असू शकते, अशी चर्चा रंगत आहे. १६ ऑगस्ट रोजी शनिवार असल्यामुळे वाशिम रेल्वे स्टेशनहून रात्री उशिरा गंगानगर - नांदेड, नागपूर- कोल्हापूर, अमरावती-पुणे, अकोला - पूर्णा पॅसेंजर व काही मालवाहू रेल्वेगाड्यांचा समावेश होता. नेमका हा अपघात कोणत्या रेल्वेने घडला, याची कुठेच नोंद नाही. मात्र, मृतदेहाची अवस्था पाहिल्यानंतर काही अंशी घातपात झाल्याचीही शक्यता वर्तविल्या जात आहे. मृतक बागेश याच्या खिशामध्ये लिहिलेली दोन कागदे आढळून आल्याने रेल्वे पोलिस तपासात काय निष्पन्न करतात, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Mehkar's teenage suspicious death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.