मराठा मूक मोर्चासाठी बैठकांचे सत्र; दुचाकी फे-या!

By Admin | Updated: September 20, 2016 01:07 IST2016-09-20T01:07:10+5:302016-09-20T01:07:10+5:30

शिरपूर जैन येथे महिलांची उपस्थिती; मोर्चाची जय्यत तयारी.

Meetings for Maratha Mute Morcha; Two-wheeler | मराठा मूक मोर्चासाठी बैठकांचे सत्र; दुचाकी फे-या!

मराठा मूक मोर्चासाठी बैठकांचे सत्र; दुचाकी फे-या!

शिरपूर जैन(जि. वाशिम), दि. १९- मराठा आरक्षण, अँक्ट्रॉसिटी कायदा व कोपर्डी अत्याचारप्रकरणी वाशिम येथे २५ सप्टेंबर रोजी निघणार्‍या मोर्चाच्या अनुषंगाने जिल्हय़ात विविध ठिकाणी बैठका, मोटारसायकल रॅलीद्वारे सकल मराठा समाजाने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केल्या जात आहे.
शिरपूर जैन परिसरातील खंडाळा, वाघी, करंजी, शेलगाव खवणे, कोठा, ढोरखेडा, वसारी, तिवळी, पांगरखेडा, किन्ही घोडमोड, शेलगाव बोंदाडे, चिवरा, पांगरी नवघरे, पांगरीकुटे, जऊळका, राजाकिन्ही, अमानी आदी गावांमध्ये मराठा समाजबांधवाच्या बैठका व मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले जात आहे. १९ सप्टेंबर रोजी शिरपूरनजीकच्या तिवळी व शेलगाव खवणे या गावांमध्ये बैठक घेऊन मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
त्यामध्ये बहुसंख्य सकल मराठा समाजाचे नागरिक उपस्थित होते. यामध्ये महिलांचीही लक्षणीय उपस्थिती लाभली होती.

Web Title: Meetings for Maratha Mute Morcha; Two-wheeler