भूमिपुत्र संघटनेची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:26 IST2021-06-23T04:26:40+5:302021-06-23T04:26:40+5:30
अध्यक्षस्थानी भूमिपुत्राचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, तर प्रमुख उपस्थितीत प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा विभागप्रमुख भास्करराव बेंगाळ, समन्वयक डाॅ. माधव ...

भूमिपुत्र संघटनेची बैठक
अध्यक्षस्थानी भूमिपुत्राचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, तर प्रमुख उपस्थितीत प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा विभागप्रमुख भास्करराव बेंगाळ, समन्वयक डाॅ. माधव हिवाळे, मंगेश जरीले, प्रकाश पाटील शिंदे, अभय घुगे, रामेश्वर अवचार, उत्तमराव आरू, रवींद्र चोपडे, राजू डांगे, भीमराव खोडके, शंकरराव मुंडे, विकास झुंगरे, विजय सावके, रामेश्वर बोरकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर भूमिपुत्राचे पदाधिकारी उपस्थित होते.
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा ऑनलाईन निकाल घोषित करण्यात आला. बैठकीत राज्यातील २०२१ मधील खरीप पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला देण्यासाठी व पीक कर्ज वाटपातील दोष दूर करण्यासाठी भूमिपुत्रांकडून पुन्हा एकदा राज्य सरकारला निवेदन देण्यात आले. तसेच काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीत कोरोनामध्ये मृत पावलेल्या भूमिपुत्रांशी संबंधितांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीसाठी संतोष सुर्वे, नागेश इंगोले, संजय सदार, ज्ञानदेव भुतेकर, शंकर हुबांड, कपिल भालेराव, सुधाकर धोंगडे, गजानन जाधव, विकास पाटील, रवी जाधव, डाॅ. अमोल अवताडे, जगन अवचार, शत्रुघ्न पाटील, संतोष गव्हणे, भागवत गोटे, शिवाजी वाटाणे, गजानन पाटील सदार, सीताराम इंगोले, अर्जुनराव तुरूकमाने, पवन खोंडकर, बालाजी बिल्लारी आदी हाेते.