अज्ञात वाहनाच्या धडकेत वैद्यकीय अधिकारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 17:14 IST2021-05-04T17:13:51+5:302021-05-04T17:14:05+5:30
Medical officer killed in an Accident : डॉ. वरकड हे तालुक्यातील मोप येथील आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.

अज्ञात वाहनाच्या धडकेत वैद्यकीय अधिकारी ठार
रिसोड : एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार डॉ. शिवशंकर वरकड (३२) यांचा मृत्यू झाल्याची घटना रिसोड-मोप मार्गावर ४ मे रोजी घडली. डॉ. वरकड हे तालुक्यातील मोप येथील आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.
डॉ. वरकड हे मोप येथील आरोग्य उपकेंद्र येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत होते. ते मोप येथे येत असताना त्यांच्या मोटरसायकलला एका टिप्परने धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. एक तरुण डॉक्टरचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.