शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांना देता येणार कोविड केअर सेंटरला वैद्यकीय यंत्रसामग्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 12:49 IST

Medical equipment can be given to MLAs for Covid Care Center : एक कोटी रुपये मर्यादेत कोविड हॉस्पिटल, केअर सेंटरला ऑक्सिजन सिलिंडर यासह वैद्यकीय यंत्रसामग्री देता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता आता आमदारांनादेखील स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत एक कोटी रुपये मर्यादेत कोविड हॉस्पिटल, केअर सेंटरला ऑक्सिजन सिलिंडर यासह वैद्यकीय यंत्रसामग्री देता येणार आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना, त्या तुलनेत आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याला विलंब लागत आहे. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीलादेखील फटका बसत असून, कोविड हॉस्पिटल, कोविड सेंटर येथे आणखी आवश्यक त्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करण्यासाठी नियोजन विभागाने आता विधिमंडळ सदस्यांना अर्थात आमदारांना स्थानिक विकास निधीचा वापर करण्याची मुभा दिली आहे. जिल्हास्तरावर परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही होण्याच्या दृष्टिकोनातून सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ‘विशेष बाब’ म्हणून ‘वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य’ खरेदी करण्यासाठी आमदारांना एक कोटीपर्यंत निधी उपलब्ध करून देता येणार आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली  जात आहे.

कोेरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्रच वाढत आहे. राज्य शासनाने आमदारांना स्थानिक विकास निधीमधून एक  कोटी रुपयापर्यंत वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी एक कोटी रुपये देता येईल, असा स्तुत्य व स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. वाशिम जिल्ह्यात कोविड हॉस्पिटल किंवा अन्य सरकारी दवाखान्यांत वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने केली तर अवश्य आमदार निधीमधून निधी दिला जाईल.- अमित झनक, आमदार

टॅग्स :washimवाशिमAmit Jhankअमित झनक