‘नीट’ न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:47 IST2021-09-15T04:47:56+5:302021-09-15T04:47:56+5:30

वाशिम : नीट परीक्षा न देता मेडिकलला प्रवेश देण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. या निर्णयाबाबत जिल्ह्यातील विद्यार्थी, तज्ज्ञांची ...

Medical admission without ‘neat’; Expert, what do students think? | ‘नीट’ न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

‘नीट’ न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

वाशिम : नीट परीक्षा न देता मेडिकलला प्रवेश देण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. या निर्णयाबाबत जिल्ह्यातील विद्यार्थी, तज्ज्ञांची मते जाणून घेतली असता, चाळणी परीक्षा आवश्यक असल्याचे काहींनी सांगितले, तर बारावीतील गुणवत्तेनुसार प्रवेश असावेत, असे मत काहींनी व्यक्त केले.

बारावीनंतर कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावयाचा, यासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. वैद्यकीय प्रवेशासाठी राज्यात १२ सप्टेंबर रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेतील गुणानुक्रमानुसार शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो. सर्व राज्यांत नीट परीक्षा घेण्यात येते. दरम्यान, तामिळनाडू राज्यात नीट परीक्षेच्या १९ तास आधी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने तेथील राज्य सरकारने नीट परीक्षेतून विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक संमत केले. याबाबत जिल्ह्यातील तज्ज्ञ, विद्यार्थ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

......

काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय?

नीट परीक्षेतून राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक तामिळनाडू राज्यातील विधानसभेत मांडले गेले आणि संमतही झाले. सरकारी व खासगी संस्थांमध्ये वैद्यकीय पदवीच्या जागांसाठी विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील.

Web Title: Medical admission without ‘neat’; Expert, what do students think?