शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

एक घास ‘भुकेल्यांसाठी’ : वाशिमच्या युवकांनी चालविला उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 1:22 PM

रेल्वेस्थानक, आंबेडकर चौक , जुनी जिल्हा परिषद परिसर यासह ज्या भागात झोपडपट्टीत, रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना पोटभर अन्न दिल्या जाते.

नंदकिशोर नारे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सामाजिक कार्य करण्याची ओढ असली की, कोण काय कार्य करेल सांगता येत नाही. असाच काहीसा उपक्रम तिरुपती सिटीमधील युवकांनी चालविला आहे. भुकेलेल्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी जावून पोटभर जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे आता ज्यांची एक दिवस जेवणाची व्यवस्था झाली ते ही मोठया आतुरतेने वाट पाहताना दिसून येत आहेत.गत सहा महिन्यापूर्वी तिरुपती सिटीमधील काही युवक, नागरिक छोटेखानी कार्यक्रमानिमित्त एकत्र आले असता काही तरी सामाजिक उपक्रम राबविण्याचा विचार केला. त्यावेळी विविध विषयांवर चर्चा होवून अखेर दर रविवारी घरोघरी ताजे अन्न तयार करुन ते एकत्र करुन भुकेलेल्यांना देण्याचा उपक्रमावर शिक्कामोर्तब झाला. त्यानुसार या युवकांचा असलेला व्हॉटस अ‍ॅप गृपवर मॅसेज टाकला जातो. विशेष म्हणजे रविवारी काय मेनू राहणार याची सूचना सुध्दा गृपमध्ये टाकून दिल्या जाते. या रविवारी पुरी व भाजी बनवून एकत्र करायचा मॅसेज पडल्याबरोबर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत राधाकृष्ण मंदिराजवळ ते एकत्रित केली जाते. त्यानंतर आॅटोमध्ये हे अन्न घेवून बसस्थानक, रेल्वेस्थानक, आंबेडकर चौक , जुनी जिल्हा परिषद परिसर यासह ज्या भागात झोपडपट्टीत, रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना पोटभर अन्न दिल्या जाते. त्यानंतरही अन्न शिल्लक राहिल्यास अनाथालय, आश्रमशाळा, वसतिगृहामध्ये देवून एक चांगले कार्य हाती घेण्यात आले आहे.तिरुपती सिटी युवक मंडळांना हा उपक्रम करण्याची प्रेरणा जे मिळाली ते एका कार्यक्रमातूनच. एका कार्यक्रमामध्ये मोठया प्रमाणात अन्न शिल्लक राहिल्याने ते न फेकून देता ते गोरगरिबांमध्ये वाटून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी हे युवक परिसरात अन्न वाटपासाठी गेले असता अनेक जण धावून आले. हे पाहून दर रविवारी हा उपक्रम आपण राबविल्यास अन्नदान ही होईल आणि गोरगरिबांच्या पोटाची खळगी सुध्दा भरेल. त्यामुळे हा निर्णय गत ४ ते ५ महिन्यापूर्वी घेण्यात आला. यामध्ये कोणताही खंड न पडता सतत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची ज्यांना दर रविवारी अन्न मिळते ते आतुरतेने आपली भांडे घेवून या युवकांची प्रतिक्षा करतांना दिसून येतात. तिरुपती युवक मंडळांनी सुरु केलेल्या या उपक्रमामध्ये महिलांचाही मोठया प्रमाणात सहभाग व सहकार्य मिळत आहे. गृपवर मॅसेज पडल्याबरोबर युवकांकडून घरी आजचा मेनू कळविण्यात येतो. त्यानुसार महिला वेळेच्या आत ते तयार करुन ठेवतात. युवकांनी सुरु केलेला हा उपक्रम खरोखरचं कौतूकास्पद आहे. ज्यावेळी गोरगरिब, भुकेले या युवकांकडून अन्न घेतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये या युवकांबाबत कृतज्ञता दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमSocialसामाजिक