‘माविम’च्या अध्यक्ष साधणार महिलांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:28 IST2021-02-05T09:28:13+5:302021-02-05T09:28:13+5:30
५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते ११.३० दरम्यान कारंजा येथील रुरल मार्टला भेट देऊन बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या व ...

‘माविम’च्या अध्यक्ष साधणार महिलांशी संवाद
५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते ११.३० दरम्यान कारंजा येथील रुरल मार्टला भेट देऊन बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या व विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूंची पाहणी करतील. सकाळी ११.३० ते दुपारी १२ वाजता दरम्यान कारंजा येथील महिला बचतगट संचालित समयमती खादी हातमाग कापड निर्मिती केंद्राला भेट देतील. दुपारी १२.३० ते दुपारी १.३० पर्यंत अल्पसंख्याक लोकसंचालित साधन केंद्राची कार्यकारिणी आणि कर्मचाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. नवीन सोनखास ता. मंगरूळपीर येथे आयोजित महिला मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता पांडव उमरा येथे आयोजित कार्यक्रमातून उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतील. सकाळी ११ वाजता वाशिम माविम जिल्हा कार्यालय येथे जिल्ह्यातील लोकसंचालित साधन केंद्राची कार्यकारिणी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतील. दुपारी २.३० वाजता मालेगाव येथे आयोजत महिला मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता रिसोड तालुक्यातील सवड येथील कार्यक्रम आटोपून वाशिमकडे रवाना होतील. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता जालनामार्गे त्या औरंगाबादकडे प्रयाण करतील.