मातंग समाजाचा मोर्चा
By Admin | Updated: August 17, 2014 01:26 IST2014-08-17T01:23:50+5:302014-08-17T01:26:01+5:30
वाशिम येथे मातंग समाजाला वेगळे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाने मोर्चा काढला.

मातंग समाजाचा मोर्चा
वाशिम : मातंग समाजाला वेगळे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी १६ ऑगस्ट रोजी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाने मोर्चा काढला होता. यावेळी हजारो समाजबांधवाची उपस्थिती लाभली होती.
मातंग समाज महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येत अनुसूचित जातीमध्ये क्रमांक एकवर असून, या समाजाची प्रगती होण्यासाठी मातंग समाजाला वेगळय़ा आरक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून या विषयावर सखोल अभ्यास करून मातंग समाज क्रांतीचे जनक बाबासाहेब गोपले यांनी अनेक आंदोलने केलीत. मातंग समाजाला वेगळे पाच टक्के आरक्षण देण्याची शिफारस केलेली आहे; परंतु राज्य सरकारने या विषयावर पडदा टाकून समाजाला आरक्षणापासून वेगळे ठेवले. या प्रश्नासाठी सरकारला धारेवर धरण्यासाठी सदर मोर्चाचे आयोजन मातंग समाज आरक्षण हक्क परिषद महाराष्ट्र राज्य वाशिमच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी हजारो बांधवांची उपस्थिती होती. मार्चाच्या यशस्वीतेसाठी मातंग समाज आरक्षण हक्क परिषदेचे पदाधिकारी यांच्यासह अध्यक्ष काशिराम उबाळे, विनोद जोगदंड, संजय वैरागडे, कैलास थोरात, रवी कांबळे, नारायण डाखोरे, शाम उफाडे, माणिक बांगर, मोतीराम धबडगाव यांच्यासह कार्यकर्त्यांंनी परिङ्म्रम घेतले. या मोर्चात आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी महासंघ, अखिल भारतीय मातंग संघ, बहुजन क्रांती सेना, लहू शक्ती संग्राम परिषद, मानवी हक्क सुरक्षा दल, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना, मानवी हक्क अभियान, बहुजन रयत परिषद, शिवाजी ब्रिगेड सामाजिक संघटना, लहू सेनेचा विशेष सहभाग होता.