शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

बाजार समित्यांमध्ये हमीभावाच्या नियमाला कोलदांडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 19:19 IST

वाशिम : बाजार समित्यांमध्ये उडीद व मूगाला हमीभावापेक्षा अल्प दर मिळत असल्याने शेतकºयांचे ‘बजेट’ कोलमडत आहे. हमीभावाने मुग व उडदाची खरेदी व्हावी, यासाठी नाफेड केंद्र सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठांशी संपर्क साधावा अशी सूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना केली आहे. 

ठळक मुद्देमूग, उडदाची अल्प दराने खरेदी नाफेड केंद्राबाबत जिल्हा उपनिबंधकांचे मार्केटिंग अधिका-यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बाजार समित्यांमध्ये उडीद व मूगाला हमीभावापेक्षा अल्प दर मिळत असल्याने शेतकºयांचे ‘बजेट’ कोलमडत आहे. हमीभावाने मुग व उडदाची खरेदी व्हावी, यासाठी नाफेड केंद्र सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठांशी संपर्क साधावा अशी सूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकºयांना पावसाची योग्य प्रमाणात साथ मिळाली नाही. मृग नक्षत्रात हजेरी लावल्यानंतर अल्पावधीतच पाऊस गायब झाला. त्यानंतरही पावसात सातत्य नसल्याने काही शेतकºयांना दुबार पेरणी करावी लागली. ऐन शेंगा धरण्याच्या कालावधीत पावसाने दडी मारली. त्यामुळे मूग व उडदाच्या एकरी उत्पादनात प्रचंड घट आली. नैसर्गिक संकटे झेलत असतानाच, आता मानवनिर्मित चक्रव्यूहात बळीराजा अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. २०१७-१८ या हंगामातील मूग व उडीद बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. मूग पिकाला ५३७५ रुपये दर व २०० रुपये बोनस असा एकूण ५५७५ रुपये हमीभाव तर उडीद पिकाला ५२०० रुपये दर व २०० रुपये बोनस असा एकूण ५४०० रुपये हमीभाव जाहिर करण्यात आला आहे. या हमीभावानुसार चांगल्या दर्जाच्या उडीद व मूगाची बाजार समितीत खरेदी होणे अपेक्षीत आहे. मात्र, कोणत्याच दर्जाच्या मूग व उडदाची खरेदी बाजार समितीत हमीभावाने सुरू नसल्याचे वास्तव आहे. हमीभावापेक्षा थोड्याफार कमी फरकाने मूग व उडादाची खरेदी झाली तरीदेखील शेतकºयांना फारसा तोटा होणार नाही. मात्र, हमीभावापेक्षा तब्बल एक हजार ते १३०० रुपयापेक्षा कमी दराने उडीद व मूगाची खरेदी होत असल्याने शेतकºयांचे संपूर्ण बजेट कोलमडून जात आहे. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, अशी मागणी सर्वांकडूनच केली जाते. मात्र, अद्यापही उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत  नाही. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचे दुष्टचक्र भेदून कष्ट करणाºया  बळीराजाला सुरूवातीला पेरलेले उगवेल का याची चिंता असते. जे उगवले ते कवडीमोलाने विक्री होत असल्याची वेदना घेऊनच वाटचाल करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही. शेतकºयांचा शेतमाल बाजारात आला की गगनाला भिडलेले भाव तळाशी येतात, हा दरवर्षीचा अनुभव आताही शेतकºयांना येत आहे. अल्प भाव मिळत असल्याने लागवड खर्च अन् उत्पन्नाचा ताळमेळ बसविण्यात शेतकºयांची झोप उडाली आहे.गुरूवारी जिल्ह्यातील बाजार समितींमधील उडीद व मूगाच्या बाजारभावावर नजर टाकली असता, हमीभावापेक्षा १२०० रुपयांनी खरेदी सुरू असल्याचे दिसून आले. उडदाला ३५०० ते ४२०१ रुपये तर मूगाला ४००० ते ४४०० रुपये क्विंटल असा बाजारभाव होता. मूगाची आवक ७५० क्विंटल तर उडदाची आवक २७५० क्विंटल होती.नाफेड केंद्र सुरू करण्यासंदर्भात पत्रव्यवहार !मूग व उडदाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने वाशिम जिल्ह्यात आधारभूत किंमतीने उडीद व मूगाची खरेदी होण्यासाठी नाफेड केंद्र सुरू करावे, अशी मागणी वाशिम बाजार समितीचे संचालक राजू चौधरी यांनी १३ सप्टेंबरला जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांच्याकडे केली होती. याची दखल घेत कटके यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांशी संपर्क साधून, २५ सप्टेंबर रोजी पत्रव्यवहार केला आहे. नाफेडमार्फत मूग व उडाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत प्रधान कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधावा, अशी सूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना पत्राद्वारे केली आहे.