विवाहितेचा विनयभंग, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:42 IST2021-04-24T04:42:24+5:302021-04-24T04:42:24+5:30

पीडित विवाहिता हिने फिर्यादीत म्हटले की, दहा वर्षांपूर्वी तिचे लग्न कासारखेड (तालुका - बार्शीटाकळी) येथे झाले. तिला पाच वर्षांचा ...

Marital molestation, filing a case against one accused | विवाहितेचा विनयभंग, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहितेचा विनयभंग, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पीडित विवाहिता हिने फिर्यादीत म्हटले की, दहा वर्षांपूर्वी तिचे लग्न कासारखेड (तालुका - बार्शीटाकळी) येथे झाले. तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. पतीसोबत पटत नसल्याने ती माहेरी भोयनी येथे चार वर्षांपासून आईकडे राहते. तिचा दाजी (जावई) नेहमी येथे येतो व लग्न कर, असे आमिष दाखवितो. २२ एप्रिल रोजी दुपारी घरात एकटी असताना त्याने लग्न कर असे म्हणून वाईट उद्देशाने हात धरला व विनयभंग केला, असे तक्रारीत नमूद आहे. आरडाओरड केली तेव्हा शेजारी धावून आले. दरम्यान आरोपी घटना ठिकाणावरून पसार झाला. मानोरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शिशिर मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुभाष महाजन करीत आहेत.

Web Title: Marital molestation, filing a case against one accused