अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा, ठिय्या आंदाेलन

By नंदकिशोर नारे | Updated: January 11, 2024 15:11 IST2024-01-11T15:10:28+5:302024-01-11T15:11:30+5:30

अंगणवाडी कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी म. रा. अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मानाेरा येथे न ११ जानेवारी रोजी मोर्चा काढून पंचायत समिती आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

March of Anganwadi Employees, Thiya Andelaan | अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा, ठिय्या आंदाेलन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा, ठिय्या आंदाेलन

वाशिम : अंगणवाडी कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी म. रा. अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मानाेरा येथे न ११ जानेवारी रोजी मोर्चा काढून पंचायत समिती आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी कर्माऱ्यांना  बजावल्या नोटीसची होळी केली आणि आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

११ जानेवारीपासून जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कार्यालयावर बेमुदत ठिय्या धरणे आंदोलन व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या बेकायदेशीर नोटीसची होळी केली जाईल. असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार हे आंदाेलन करण्यात आले.

तेव्हा मागणी मान्य होईपर्यंत, लाभ मिळेपर्यंत, अंगणवाडी कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. म्हणून हे आंदोलन करीत आहोत. आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी प्रमिला पखाले यांच्यासह शेकडो अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

Web Title: March of Anganwadi Employees, Thiya Andelaan