कारंजात मराठी नववर्षानिमित्त रॅली, पारंपारिक वेशभूषा,व भगव्या झेंड्यानी वेधले लक्ष
By संतोष वानखडे | Updated: April 9, 2024 18:52 IST2024-04-09T18:50:56+5:302024-04-09T18:52:58+5:30
मोटारसायकल रॅलीतील सहभागींनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला तर पारंपारिक वेशभूषा आणि भगव्या झेंड्यानी अनेकांचे लक्ष वेधले.

कारंजात मराठी नववर्षानिमित्त रॅली, पारंपारिक वेशभूषा,व भगव्या झेंड्यानी वेधले लक्ष
वाशिम : कारंजा येथे श्री रामनवमी उत्सव समिती, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्यावतीने गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त मंगळवार ९ एप्रिलला मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
कारंजातील पोहावेश परिसरातील मोठे राम मंदिरापासून या रॅलीला प्रारंभ झाला. शहरातून मार्गक्रमण करीत राम मंदिर परिसरातच या मोटरसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला. आगामी श्रीराम नवमी निमत्त उत्सव समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही ही मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
मोटारसायकल रॅलीतील सहभागींनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला तर पारंपारिक वेशभूषा आणि भगव्या झेंड्यानी अनेकांचे लक्ष वेधले. या रॅलीत कारंजा शहरासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.