वाशिम येथे रविवारी मराठा क्रांती मोर्चा जनजागृती रॅली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:26 IST2017-08-03T01:24:52+5:302017-08-03T01:26:49+5:30

वाशिम : मुंबई येथे ९ ऑगस्टला आयोजित करण्यात  आलेल्या राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाच्या पृष्ठभूमीवर  वाशिम जिल्ह्यात जनजागृतीपर रॅलीचे आयोजन रविवार, ६  ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता करण्यात आले आहे. 

Maratha Kranti Morcha rally at Washim on Sunday | वाशिम येथे रविवारी मराठा क्रांती मोर्चा जनजागृती रॅली 

वाशिम येथे रविवारी मराठा क्रांती मोर्चा जनजागृती रॅली 

ठळक मुद्देमुंबई येथे ९ ऑगस्टला राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाराज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाच्या पृष्ठभूमीवर जनजागृती रॅलीविश्रामगृहावर २  ऑगस्ट रोजी  बैठकीचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मुंबई येथे ९ ऑगस्टला आयोजित करण्यात  आलेल्या राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाच्या पृष्ठभूमीवर  वाशिम जिल्ह्यात जनजागृतीपर रॅलीचे आयोजन रविवार, ६  ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता करण्यात आले आहे. 
सकल मराठा समाजाच्यावतीने येथील विश्रामगृहावर २  ऑगस्ट रोजी  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या  बैठकीमध्ये समाजबांधवांनी मुंबई येथे बुधवार, ९ ऑगस्ट  रोजी आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या  जनजागृतीसाठी वाशिम शहरातून मोटारसायकल रॅली  काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोटारसायकल रॅली छत्र पती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून पाटणी चौक,  जिजाऊ चौक, पुसद नाका, मन्नासिंह चौक व जुन्या गणप ती मिरवणूक मार्गाने निघणार आहे. या रॅलीमध्ये जिल्ह्या तील सर्व तालुक्यातील व गावातील समाजबांधव सहभागी  होणार आहेत. रॅलीत महिलांचा सहभागही राहणार  असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने  दिली आहे. 
 
Web Title: Maratha Kranti Morcha rally at Washim on Sunday