Maratha Kranti Morcha : रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 14:20 IST2018-07-27T14:17:45+5:302018-07-27T14:20:23+5:30
वाशिम : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने पुकारलेल्या बंदला २७ जुलै रोजी रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे करण्यात आलेल्या रास्ता रोकोला प्रतिसाद लाभला.

Maratha Kranti Morcha : रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने पुकारलेल्या बंदला २७ जुलै रोजीरिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे करण्यात आलेल्या रास्ता रोकोला प्रतिसाद लाभला.
मराठा आरक्षणासाठी कानडगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली. त्याउपरही शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात तातडीने हालचाली करीत नसल्याचे पाहून सकल मराठा समाज बांधवांनी राज्यभरात बंदची हाक दिली आहे. सरकारची मेगा भरती रद्द करावी, तातडीने आरक्षण द्यावे, आरक्षणासाठी प्राणास मुकलेल्या तरुणास शहीद घोषित करावे, त्याच्या कुटुंबास ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यात आंदोलन करण्यात येत आहे. २७ जुलै रोजी मोठेगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी रिसोड - मेहकर रस्त्यावरील वाहने काही वेळ बंद होते. जवळपास एक तास चाललेल्या रस्ता रास्तारोको आंदोलनामध्ये शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अखेर रिसोड नायब तहसीलदार बर्वे यांनी आंदोलनास भेट देऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी रिसोड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय रत्नपारखी यांच्यासह चमु घटनास्थळी उपस्थित होते.