फळबाग लागवडीमध्ये आंबा व डाळींबांच्या अनुदानात वाढ
By Admin | Updated: May 14, 2014 00:28 IST2014-05-14T00:22:24+5:302014-05-14T00:28:01+5:30
वैदर्भीय शेतकर्यांचे नगदी पिक अससलेल्या संत्र्याना या वाढीतून डावलण्यात आलेले आहे.परिणामी, वैदर्भीय शेतकर्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

फळबाग लागवडीमध्ये आंबा व डाळींबांच्या अनुदानात वाढ
देपूळ (वाशिम) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेतून राबविण्यात येणार्या सुधारित फळबाग योजनेच्या अनुदानात वाढ झाली आहे. सदर वाढ आंबा व डाळींबाच्या बागायतदारांना लागु राहणार असली तरी वैदर्भीय शेतकर्यांचे नगदी पिक अससलेल्या संत्र्याना या वाढीतून डावलण्यात आलेले आहे. परिणामी, वैदर्भीय शेतकर्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. आंबा व अळीबासाठी यापूर्वी मग्रारोहयो अंतर्गत एक हेक्टर फळबाग लागवडीसाठी ९0६ ९६४ रुपये या प्रमाणे अनुदान मिळत होते. हल्ली तो १ लाख२१ हजार ५६ रुपये करण्यात आले आहे. मात्र यामध्ये विदर्भातील ओळख असलेल्या संत्र्याला तर मराठवाडयातील ओळख असणार्या मोसंबी फळपिकाला वगळण्यात आले. त्याच बरोबर वगळण्यामध्ये आवळा, चिकु, निंबू, पेरु इत्यादी पिकाचे अनुदान वाढविले आहे. मात्र आंबा आणि डाळींब याकरिरता लागणार्या सामृग्री खते व कलम यामध्ये वाढ करण्यात आली. वास्तविक पाहता फळबाग लागवड कार्यक्रम प्रभावी प्रमाणे वाढविण्याकरिता आंबा व डाळींबा प्रमाणे संत्र लिंबु, मोसंबी पेरु चिकु इत्यादी पिकाच्या सामृगी आनुदानात वाढ व्हायला पाहिजे होती परंतु शासनाने निर्णय घेतांना सर्व पिकासाठी समान न्याय द्यायला पाहिजे होता परंतु तसे या निर्णयात केले नसून विशिष्ट प्रांतातील पिकाला न्याय देण्याचा प्रयत्न या शासन निर्णयातून झाला आहे.