मंगरुळपीर तालुक्यातील उत्पन्न ५० टक्के घटणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 20:15 IST2017-09-12T20:15:30+5:302017-09-12T20:15:30+5:30
यावर्षी खरीप हंगामात झालेल्या अपुºया अनियमित पावसामुळे खरीपातील पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यात खरीपातील मुख्य पिक असलेल्या सोयाबीनला मोठा फटका बसला आहे. उशिरा पेरणी झालेल्या सोयाबीन झाडाला श्ेोंगाच नसल्याने सोयाबीन सोंगावे की नाही असा प्रश्न शेतकºयांना निर्माण झाला आहे. इतर सोयाबीन हिरवेगार आहे पण शेंगा कमी असल्याने उत्पन्न ५० टक्के घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मंगरुळपीर तालुक्यातील उत्पन्न ५० टक्के घटणार!
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : यावर्षी खरीप हंगामात झालेल्या अपुºया अनियमित पावसामुळे खरीपातील पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यात खरीपातील मुख्य पिक असलेल्या सोयाबीनला मोठा फटका बसला आहे. उशिरा पेरणी झालेल्या सोयाबीन झाडाला श्ेोंगाच नसल्याने सोयाबीन सोंगावे की नाही असा प्रश्न शेतकºयांना निर्माण झाला आहे. इतर सोयाबीन हिरवेगार आहे पण शेंगा कमी असल्याने उत्पन्न ५० टक्के घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तालुक्यात सोयाबीनचा सर्वात जास्त पिक आहे, सोयाबीन मुख्य पिक असुन खरीपात पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड पडल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या, पेरणी नंतर वेळेवर नसल्याने वाढ खुंटली तर पुलावर पाणी नसल्याने ५० टक्के पेरण्या उशिरा झाल्या, उशिरा झालेल्या सोयाबीन शेतकºयांच्या हातातुन पूर्णपणे गेले झाडाला श्ेंगाच नसल्याने श्ेतकरी हवालदिल झाला आहे. मागील वर्षी सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळाल्याने शासनाने प्रती क्विंटल अनुदान जाहीर केले होते, मात्र जाहीर केलेले अनुदान वर्ष झाले तरी कागदावरच आहे.
कृषी विभागाचे पाहिजे तसे मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकºयांना या नुकसान भरपाई मिळते की नाही याबाबत तर्कवितर्क लावल्या जात आहे. वरिष्ठांनी लक्ष देवून शेतकºयांना दिलासा देणे गरजेचे आहे.