मालेगाव शहर कडकडीत बंद

By Admin | Updated: June 8, 2017 13:31 IST2017-06-08T13:31:57+5:302017-06-08T13:31:57+5:30

 गुरुवारी सर्व बाजारपेठ  कड़कड़ित बंद ठेवण्यात आली होती.

Malegaon city is closed in the straw | मालेगाव शहर कडकडीत बंद

मालेगाव शहर कडकडीत बंद

मालेगांव :- शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी ८ जून रोजी  मालेगांव शिवसेनेच्यावतीने बंदची हाक देण्यात आली होती , त्याला प्रतिसाद म्हणून सर्व स्तरतून पाठिंबा मिळाला .  गुरुवारी सर्व बाजारपेठ  कड़कड़ित बंद ठेवण्यात आली होती.
        राज्यात सर्वत्र शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी संप सुरु आहे.  अनेक ठिकाणी रास्ता रोको आणि बंद पुकारण्यात येत आहे .मालेगांव येथे सुद्धा  शिवसेना कार्यध्यक्ष उद्वव ठाकरे ,खा. भावना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर अध्यक्ष संतोष जोशी यांच्या नेतृत्वात तालुका आणि शहर  शाखेच्यावतीने बंद पुकरण्यात आला होता .  सकाळी ८ वाजेपासून सर्व पदाधिकारी बंद ठेवन्यासाठी  सर्व शहरतील लोकांना भेटून बंदला सहकार्य करण्याचे सांगितले. त्याला सर्वस्तरातून पाठिंबा मिळाला यावेळी संतोष सुरडकर , शहर प्रमुख संतोष जोशी , अभी घुगे , देवा राऊत ,योगेश काटेकर, गजानन बळी, अमोल भालेराव, गजानन बोरचाटे ,भगवान बोरकर, आशिष डहाळे, योगेश काटेकर, प्रमोद औझा, कान्हा यादव, विनोद बानाईतकर, अशु कंकाळ ,मनोज काळबाडे  यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्तिथ होते.

Web Title: Malegaon city is closed in the straw