महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण!

By Admin | Updated: June 2, 2017 01:32 IST2017-06-02T01:32:05+5:302017-06-02T01:32:05+5:30

आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल

Mahavitaran's junior engineering assaulted! | महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण!

महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण!

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : नवीन घरगुती वीज मीटर देण्याच्या मागणीवरून झालेल्या वादात आरोपीने महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण केली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रेम बाळू कदम (रा. चांदर्ई) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये १ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारंजा येथील वीज वितरणच्या कार्यालयात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत नीलेश ठोरे (वय २४ वर्षे) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की चांदई येथील वीज ग्राहक प्रेम बाळू कदम याने नवीन इलेक्ट्रॉनिक मीटरची मागणी करून नाहक वाद घातला. एवढेच नव्हे; तर आपणास मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रेम कदम याच्याविरुद्ध कलम ३५३, ३२३, ५०४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस करीत आहेत.

Web Title: Mahavitaran's junior engineering assaulted!