राज्याबराेबरच वाशिम जिल्ह्यातही महाविकास आघाडी साथ-साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 12:39 IST2021-08-14T12:39:05+5:302021-08-14T12:39:16+5:30
Mahavikas Aghadi : जिल्हा परिषदेसह, तीन पंचायत समित्यांमध्ये आघाडी एकत्र नांदत आहेत.

राज्याबराेबरच वाशिम जिल्ह्यातही महाविकास आघाडी साथ-साथ
- नंदकिशोर नारे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :राज्यात महाआघाडीचे सरकार असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तीन पक्ष एकत्र आहेत. जिल्ह्यातही महाविकास आघाडी साथ साथ दिसत असून, जिल्हा परिषदेसह, तीन पंचायत समित्यांमध्ये आघाडी एकत्र नांदत आहेत.
जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांमध्ये मात्र आघाडीला यश न मिळाल्याने इतरांची सत्ता आहे. वाशिम नगरपालिकेचे नगराध्यक्ष जनतेतून निवडून आल्याने शिवसेनेचे आहेत. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची संख्या बाेटावर माेजण्याइतपत असल्याने येथे आघाडीची सत्ता म्हणता येणार नाही, असे असले तरी जिल्ह्यात शिवसेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेस साेबत दिसून येतात.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातही आम्ही महाविकास आघाडीतील पक्षासाेबत राहताे.
- सुरेश मापारी,
शिवसेना, जिल्हाध्यक्ष
पक्षश्रेष्ठी यांच्याकडून येत असलेल्या सर्व नियमांचे पालन करून महाविकास आघाडी नियमांचे पालन जिल्ह्यात सुरू आहे. आघाडी व्यवस्थित आहे.
- ॲड. दिलीपराव सरनाईक,
काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष
राज्याप्रमाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीत असलेले सर्व पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व साेबत राहून कार्य करीत आहेत.
- चंद्रकांत ठाकरे,
राष्ट्रवादी काॅंग्रेस, जिल्हाध्यक्ष