महारेशीम अभियानाचा थाटात शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 01:11 PM2020-01-11T13:11:20+5:302020-01-11T13:11:38+5:30

रेशीम शेतीची माहिती पोहोचविण्यासाठी जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालयाने ‘रेशीम रथ’ तयार केला आहे.

Mahareshim Mission launches in Washim | महारेशीम अभियानाचा थाटात शुभारंभ

महारेशीम अभियानाचा थाटात शुभारंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रेशीम शेतीच्या प्रसारासाठी तसेच रेशीम शेतीची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी राबविण्यात येणाºया महारेशीम अभियानाचा जिल्ह्यात थाटात प्रारंभ झाला. ‘रेशीम रथा’ला १० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी हिरवी झेंडी दाखविली.
ग्रामीण भागातील शेतकº्यांपर्यंत रेशीम शेतीची माहिती पोहोचविण्यासाठी जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालयाने ‘रेशीम रथ’ तयार केला आहे. शुभारंभ कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा रेशीम विकास अधिकारी ए. एल. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणाºया हमखास व शाश्वत उत्पन्नाची माहिती देण्यासाठी ‘रेशीम रथ’ जिल्ह्यातील गावांमध्ये फिरविण्यात येणार आहे. महारेशीम अभियान अंतर्गत जिल्ह्यात रेशीम शेतीच्या प्रसारासाठी, माहिती देण्याबरोबरच नवीन रेशीम लागवडसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. रेशीम उद्योग हा कृषी व वन संपत्तीवर आधारीत रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. ग्रामीण भागातील शेतकºयांचा आर्थिक स्तर व जीवनमान उंचावण्यास मदत करणारा हा उद्योग आहे. परंतू, शेतकºयांना या उद्योगाची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या उद्योगाकडे वळलेले नाहीत. या पृष्ठभूमीवर व्यापक प्रमाणात जनजागृती करणे आणि तुती लागवड करण्यासाठी शेतकºयांची नोंदणी करणे या दुहेरी उद्देशाने जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविले जात आहे, असे मोरे यांनी सांगितले.
रेशीम शेतीचे महत्व पटवून देण्यासाठी रेशी रथ हा जिल्ह्यातील ४९१ ग्राम पंचायतींमध्ये फिरविण्यात येणार आहे. या दरम्यान शेतकºयांची नोंदणी करून घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील शेतकºयांनीदेखील अधिकाधिक प्रमाणात नोंदणी करावी तसेच या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मोरे यांनी केले.
(प्रतिनिधी)

Web Title: Mahareshim Mission launches in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.