महाप्रसाद कार्यक्रम उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:48 IST2021-08-18T04:48:22+5:302021-08-18T04:48:22+5:30

माहुली : येथून जवळच असलेल्या ग्राम भुली येथील जगदीश्वरनंद महाराज धार्मिक ठिकाणावर भाविक भक्तांची शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून, ...

Mahaprasad program in excitement | महाप्रसाद कार्यक्रम उत्साहात

महाप्रसाद कार्यक्रम उत्साहात

माहुली : येथून जवळच असलेल्या ग्राम भुली येथील जगदीश्वरनंद महाराज धार्मिक ठिकाणावर भाविक भक्तांची शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून, १६ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार रोजी जगदंबा माता व संत सेवालाल महाराज यांना भोग विधी लावून महाप्रसादाचे वाटप‌ करण्यात आले.

जगदीश्वरनंद महाराज भारत भ्रमण करत असताना, वाशिम जिल्ह्यातून मानोरा तालुक्यातून भुली येथे त्यांना विश्रांती घेतली. महाराजांनी ज्या ठिकाणी विश्रांती घेतली, त्या ठिकाणी आज धुणी लावण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून येथे धार्मिक उत्सव भोग भंडाराचा कार्यक्रम होत असतात. या धार्मिक स्थळावर गोर बंजारा समाज व इतर समाजातील भावी भक्त दर्शनला येतात. श्रावण महिन्यात दुसरा सोमवार १६ ऑगस्टला भाविक भक्त शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून जगदंबा माता, संत सेवालाल महाराज, संत जेतलाल महाराज आणि संत रामराव महाराज यांना भोग लावून महाप्रसाद‌ वाटप करण्यात आले.

Web Title: Mahaprasad program in excitement