महाबीजकडे गव्हाच्या बियाण्यांचा तुटवडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 05:20 PM2019-11-24T17:20:40+5:302019-11-24T17:21:20+5:30

नोव्हेंबर महिना संपत आला तरी, अपेक्षीत आणि आवश्यक प्रमाणापेक्षा खुप कमी बियाणे महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापनाकडे उपलब्ध झाले आहे.

Mahabeej has not sufficient Wheat seeds in Washim District | महाबीजकडे गव्हाच्या बियाण्यांचा तुटवडा 

महाबीजकडे गव्हाच्या बियाण्यांचा तुटवडा 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: यंदा वाशिम जिल्ह्यात आॅक्टोबरच्या अखेरनंतर आठवडाभर कोसळलेल्या पावसामुळे जलाशय तुडूंब भरले असून, विहिरी, कूपनलिकांची पातळी वाढली आहे. त्यामुळे रब्बी हंगामात गहू पिकाला पाणी देणे शक्य असल्याने शेतकरी याच पिकाच्या पेरणीवर भर देत आहेत. तथापि, पेरणीची वेळ संपत येत असतानाही महाबीजकडे या पिकाच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. 
वाशिम जिल्ह्यात महाबीजच्या प्रकल्पांतर्गत १५ हजार हेक्टर क्षेत्रावर गहू पिकाची पेरणी केली जाते. या क्षेत्रासाठी प्रति हेक्टर १ क्विंटलप्रमाणे १५ हजार क्विंटल बियाण्यांची गरज असते. त्यानुसार महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापनाने नियोजन करून वरिष्ठस्तरावर बियाणे उपलब्ध करण्याची मागणीही केली आहे. तथापि, नोव्हेंबर महिना संपत आला तरी, अपेक्षीत आणि आवश्यक प्रमाणापेक्षा खुप कमी बियाणे महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापनाकडे उपलब्ध झाले आहे. महाबीजच्यावतीने प्रामुख्याने लोकवन, ६२२२, फुले नेत्रावती, त्र्यंबक, एचडी २१८९, डीब्ल्यू ४९६, या वाणांचा बिजोत्पादन प्रकल्पासाठी वापर केला जातो; परंतु गतवर्षी राज्यभरात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पातील बियाणे तपासणीदरम्यान नापास झाले अर्थात, गतवर्षी गहू बियाण्यांची क्षमता आवश्यकतेपेक्षा कमी आढळून आली. त्यामुळे महाबीजला आवश्यक प्रमाणात बियाणे उपलब्ध करता आले नाही. त्यामुळे महाबीजला इतर बियाण्यांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी नियोजनही केले असले तरी, वेळेवर बियाणे उपलब्ध होण्यास विलंब लागत आहे. वाशिम जिल्ह्यात साधारण डिसेंबरच्या मध्यंतरापर्यंत गहू पिकाची पेरणी केली जात असते. तथापि, अद्याप आवश्यक प्रमाणात बियाणे उपलब्ध झाले नाहीत. अद्यापही महाबीजकडे साधारण सहा हजार क्विंटल गहू बियाण्यांचा तुटवडा असून, आता वेळ निघून गेल्यावर बियाणे उपलब्ध झाल्यास महाबीजला ते बियाणे बाजारात लिलावाद्वारे विकावे लागण्याची शक्यता आहे. 
 
हार्वेस्टरच्या वापराचा परिणाम
महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पात गहू पिकाची पेरणी करणारे शेतकरी गहू काढणीसाठी हार्वेस्टरचा वापर अधिक करतात. या पद्धतीमुळे गहू पिकाची काढणी झपाट्याने आणि कमी खर्चात होत असली तरी, या पद्धतीमुळे गहू बियाण्यांचा दर्जा खालावतो. गव्हाच्या नख्या हार्वेस्टरमुळे तुटल्यानंतर त्याची उगवण क्षमता कमी होते. याच पद्धतीचा वापर गतवर्षी बहुतांश शेतकºयांनी केल्यामुळे त्यांचे बियाणे तपासणीत सदोष आढळून आले आणि महाबीजकडे गहू बियाण्यांचा यंदा तुटवडा निर्माण झाला.

Web Title: Mahabeej has not sufficient Wheat seeds in Washim District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.