जिल्हा रुग्णालयात मडावी यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:27 IST2021-06-11T04:27:55+5:302021-06-11T04:27:55+5:30

पूर्णवेळ शासकीय सेवेत राहून सेवा देत असलेल्या भिषक डाॅक्टरांची संख्या आजमितीस नगण्य आहे. त्यापैकी डाॅ. मडावी एक आहेत. कोरोना ...

Madavi felicitated at District Hospital | जिल्हा रुग्णालयात मडावी यांचा सत्कार

जिल्हा रुग्णालयात मडावी यांचा सत्कार

पूर्णवेळ शासकीय सेवेत राहून सेवा देत असलेल्या भिषक डाॅक्टरांची संख्या आजमितीस नगण्य आहे. त्यापैकी डाॅ. मडावी एक आहेत. कोरोना काळात रुग्णांवर उपचार करताना पहिल्या लाटेत ते स्वत: बाधित झाले होते. स्थिती गंभीर झाल्याने त्यांना अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. कोरोनातून बरे झाल्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा कर्तव्यावर रुजू होऊन कोरोना रुग्णांची सेवा केली. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याचा गाैरव म्हणून पूर्णवाद युवा मंचने पुढाकार घेऊन त्यांचा जिल्हा रुग्णालयात ८ जून रोजी सत्कार केला. या छोटेखानी कार्यक्रमास ‘पूर्णवाद’चे रोहित पत्की, साैरभ आरळकर, श्रीहरी वाळके, अनुजा पुरणकर, मधुमती वाळके, तेजस्विनी आगाशे, अनुप्रिया आरळकर, सिद्धी मुळे यांच्यासह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. खेळकर, डाॅ. बालाजी हरण, डाॅ. डावरे, डाॅ. दहात्रे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Madavi felicitated at District Hospital