लोकमतचा प्रभाव : अखेर एकांब्याची जिल्हा परिषद शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 04:16 PM2018-08-28T16:16:18+5:302018-08-28T16:17:28+5:30

लोकमतने २२ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर ही शाळा २८ आॅगस्ट रोजी पुन्हा सुरू करण्यात आली.

 Lokmat's impact: Finally, school started at village | लोकमतचा प्रभाव : अखेर एकांब्याची जिल्हा परिषद शाळा सुरू

लोकमतचा प्रभाव : अखेर एकांब्याची जिल्हा परिषद शाळा सुरू

Next
ठळक मुद्देशाळेत १४ विद्यार्थी असतानाही कमी पटसंख्येच्या नावाखाली ही शाळा बंद करण्यात आली होती.या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून शिक्षण विभागाचे लक्ष वेधले.त्याची दखल घेऊन पंचायत समिती प्रशासनाने ही शाळा २८ आॅगस्ट रोजी सुरू केली.


कमी पटसंख्येच्या नावाखाली केली होती बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील एकांबा येथील १४ विद्यार्थी असलेली जि.प. शाळा कमी पटसंख्या असल्याचे कारणसमोर करून बंद करण्यात आली होती. या संदर्भात लोकमतने २२ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर ही शाळा २८ आॅगस्ट रोजी पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले असून, पालकवर्गात समाधानाचे वातावरण आहे.
कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सामाजिकरणावर परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन या शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन नजिकच्या शाळांत करण्याचे शासनाचे निर्देश होते. या अंतर्गत १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांच बंद करणे आवश्यक होते; परंतु मंगरुळपीर तालुक्यातील एकांबा येथील शाळेत १४ विद्यार्थी असतानाही कमी पटसंख्येच्या नावाखाली ही शाळा बंद करण्यात आली होती. त्यातच या विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजनही करण्यात आले नव्हते. त्यामुळे या शाळेतील बहुतांश विद्यार्थी हे शाळाबाह्य होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून शिक्षण विभागाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन पंचायत समिती प्रशासनाने ही शाळा २८ आॅगस्ट रोजी सुरू केली. त्यामुळे येथील आदिवासी विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान आता टळणार आहे.

Web Title:  Lokmat's impact: Finally, school started at village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.