१७,७०६ शेतकऱ्यांचे कर्ज खाते ठरले अपात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 03:15 PM2020-03-02T15:15:45+5:302020-03-02T15:16:02+5:30

१७ हजार ७०६ शेतकºयांचे कर्ज खाते अपात्र ठरल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.

Loan accounts of 17706 farmers become ineligible! | १७,७०६ शेतकऱ्यांचे कर्ज खाते ठरले अपात्र!

१७,७०६ शेतकऱ्यांचे कर्ज खाते ठरले अपात्र!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत रविवार, १ मार्चपर्यंत १ लाख ४२३ अर्ज पोर्टलवर अपलोड झाले आहेत. संबंधित शेतकऱ्यांना त्यांचे आधार प्रमाणिकीकरण करावे लागणार असून, त्यासाठी जिल्ह्यात महाआॅनलाईनचे १० तसेच आपले सरकार सेवा केंद्र व बँकांमध्येही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान निकष पूर्ण न करणाºया १७ हजार ७०६ शेतकºयांचे कर्ज खाते अपात्र ठरल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.
१ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांना २ लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याची योजना राज्य शासनाने लागू केली. त्याची अंमलबजावणी वाशिम जिल्ह्यात जोरासोरात सुरू झाली आहे. याअंतर्गत कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करून वाशिम तालुक्यातील १४ हजार ८२४, मालेगाव १३ हजार २५१, रिसोड १५ हजार ८०७, कारंजा १३ हजार १६०, मंगरूळपीर १४ हजार ७४ आणि मानोरा तालुक्यातील १२ हजार ५१८ अशा एकंदरित ८३ हजार ६३४ शेतकºयांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. त्यापैकी आधार प्रमाणिकीकरण प्रक्रियेनंतर १७ हजार ७०६ शेतकºयांचे कर्ज खाते निकष पूर्ण न झाल्याने अपात्र ठरविण्यात आले आहेत; तर उर्वरित ६५ हजार ९२८ शेतकºयांच्या आधार प्रमाणिकीकरण प्रक्रियेस सोमवारपासून गती प्राप्त होणार असल्याचे हिंगे यांनी सांगितले.


आपले सरकार सेवा केंद्र, सामूहिक सुविधा केंद्रांना मार्गदर्शक सूचना
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांना आधार प्रमाणिकीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात महाआॅनलाईनचे १० आधार केंद्र कार्यान्वित असून आपले सरकार सेवा केंद्र, सामूहिक सुविधा केंद्रांसह बँकांमध्येही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दरम्यान, शेतकºयांची आधार प्रमाणिकीकरणादरम्यान कुठल्याच स्वरूपात गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा आढावा शनिवारी जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला.


जिल्हा प्रशासनाकडून महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची चोख अंमलबजावणी सुरू झालेली आहे. याअंतर्गत आतापर्यंत १ लाख ४२३ शेतकºयांचे कर्ज खाते पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत. त्यापैकी आधार प्रमाणिकीकरण प्रक्रियेत १७ हजार ७०६ कर्ज खाते अपात्र ठरले असून उर्वरित शेतकºयांच्या आधार प्रमाणिकीकरणाची प्रक्रिया देखील गतीमान झाली आहे.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: Loan accounts of 17706 farmers become ineligible!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.