रिसोड शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या; वाहतूक प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 14:10 IST2019-08-07T14:10:43+5:302019-08-07T14:10:52+5:30
रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या; वाहतूक प्रभावित !

रिसोड शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या; वाहतूक प्रभावित
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) - शहरातील विविध रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाटे जनावरांचा ठिय्या असल्याने वाहतूक प्रभावित होत आहे. या समस्येपासून नागरिकांची सुटका करण्यात प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याने नगरपालिका हतबल झाली आहे की काय असा प्रश्न पडला आहे.
शहरातील रस्त्यावर मोकाटे जनावरे कळपा -कळपाने फिरत आहेत तर रस्त्याच्या मध्यभागी थांबून रस्त्यावर बसत आहेत. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. काही रस्त्यावर अचानकपणे हे मोकाट जणावरे रस्ता ओलांडत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाºया रिसोड बसस्थानक ते लोणीफाटा, सिव्हिल लाईन मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरांचे वास्तव्य वाढले आहे. रस्त्यावर बसलेली जनावरे रात्रीच्या वेळी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावर जनावरांचा ठिय्या असल्याने वाहनचालकांना अर्ध्याच रस्त्याचा वापर करीत ये-जा करावी लागत आहे. या मोकाट जनावरांचा नगर पालिकेने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.