पशुधन चोरणारी टोळी केली गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST2021-09-27T04:45:13+5:302021-09-27T04:45:13+5:30

शहरात व ग्रामीण भागात मागील काही दिवसांमध्ये पशुधन चोरीसारख्या अनेक घटना घडल्या. पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा ...

Livestock theft gang made | पशुधन चोरणारी टोळी केली गजाआड

पशुधन चोरणारी टोळी केली गजाआड

शहरात व ग्रामीण भागात मागील काही दिवसांमध्ये पशुधन चोरीसारख्या अनेक घटना घडल्या. पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक जगदाळे यांनी ताबडतोब पोलीस स्टेशन डीबी पथक, पोलीस उपनिरीक्षक संतोष आघाव व चमूने सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे या घटनेचा शोध घेतला. वाहनमालक मोहमद जावेद अब्दुल सईद यास गुन्ह्यात अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच, चोरीकरिता चारचाकी वाहन वापरले असून, शेख महेबूब शेख ईस्माईल, शेख जुबेर शेख हबीब, शेख रहेमान शेख अब्दुल्ला (सर्व रा अकोला) असे साथीदार असल्याचे त्याने सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक भारंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, पोलीस निरीक्षक जगदाळे, तसेच पोलीस निरीक्षक सायबर सेल वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष आघाव, कर्मचारी अमोल मुंदे, मोहम्मद परसुवाले, सचिन शिंदे, मिलिंद भगत, जितेंद्र ठाकरे यांनी पार पाडली.

....

चारचाकी वाहन जप्त

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून या घटनेतील आरोपींना शेगाव व अकोला येथून शिताफीने ताब्यात घेतले. या गुन्हयात वापरलेले (एमएच ०४ ई एस ८११७) क्रमांकाचे चारचाकी वाहन आरोपीकडून जप्त करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास सुरू असून, इतर ठिकाणी आरोपींनी केलेल्या गुन्ह्यांबाबत जिल्ह्यातील पोलीस स्टेशन येथे माहिती देण्यात आली.

Web Title: Livestock theft gang made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.