साहित्य महागले; घरकुलांचे स्वप्न आवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST2021-08-23T04:43:57+5:302021-08-23T04:43:57+5:30

वाशिम : बांधकाम साहित्याचे दर गेल्या काही दिवसांत चांगलेच वाढले आहेत. यामुळे घर बांधकामाचे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न आवाक्याबाहेर जात ...

Literature is expensive; The dream of the family is out of reach | साहित्य महागले; घरकुलांचे स्वप्न आवाक्याबाहेर

साहित्य महागले; घरकुलांचे स्वप्न आवाक्याबाहेर

वाशिम : बांधकाम साहित्याचे दर गेल्या काही दिवसांत चांगलेच वाढले आहेत. यामुळे घर बांधकामाचे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न आवाक्याबाहेर जात आहे.

कोरोना काळातही बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाली. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतरही बांधकाम साहित्याच्या दरात वाढ होतच आहे. ५० किलो सिमेंटच्या पोत्यामागे ४० ते ६० रुपयांची वाढ होऊन सध्या ४०० ते ४४० रुपयांवर पोहोचले आहे. स्टील (गज) किलोमागे ७ ते ९ रुपयांनी वाढून ६६ रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे.

लोखंडी पाईपचा दर एका महिन्यापूर्वी ५४ रुपये होता. आता ७० ते ७२ रुपये प्रतिकिलो या दराने विकले जात आहे. ६ ब्रासच्या रेतीचे दर सध्या सुमारे २८ ते ३२ हजार रुपये झाले आहेत.

Web Title: Literature is expensive; The dream of the family is out of reach