नागपूरला मिनी मंत्रालय स्थापन्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
By Admin | Updated: December 26, 2014 00:36 IST2014-12-26T00:36:54+5:302014-12-26T00:36:54+5:30
ज्ञानेश वाकुडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

नागपूरला मिनी मंत्रालय स्थापन्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
वाशिम : विदर्भ विकासाच्या दृष्टीने मिनी मंत्रालय व्हावे, या मागणीसाठी मिनी मंत्रालय संग्राम समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्याची माहिती आज २५ डिसेंबर रोजी स्थानिक विश्राम गृहामध्ये पार पडलेल्या पत्रपरिषदेमध्ये प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी दिली.
पत्रपरिषदेमध्ये माहिती देताना वाकुडकरांनी नागपूर येथे मिनी मंत्रालय स्थापन करण्याचे फायदे विषद केले. नागपूर येथे मिनी मंत्रालय स्थापन झाल्यास विदर्भ आणि मराठवाड्यातील कोट्यवधी जनतेची सोय होईल. इथली कामे इथेच होतील. जनतेचा वेळ आणि पैसा वाचेल. मुंबईवरील अतिरिक्त ताणही कमी होईल. विदर्भावरील अन्यायाची भावना कमी होण्यास मदत होईल. राज्यमंत्र्यांना अधिकार मिळतील. त्यामुळे कामाला आणि प्रक्रियेला गती मिळेल. समन्वयातून समतोल विकास हे सूत्रही प्रभावीपणे अमलात येईल.
आरोग्य संचालक, शिक्षण संचालक, महिला व बालकल्याण संचालक, समाजकल्याण संचालक ट्रायबल रिसर्च इंस्टिट्युट यासारख्या पुण्यामध्ये कार्यरत असलेल्या महत्त्वपूर्ण कार्यालयातील अर्धी कार्यालये नागपूर येथे स्थलांतरित करण्यात यावी. महाराष्ट्र विधानसभेच्या मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनाचा कालावधी समान असावा, अशी माहिती पत्रपरिषदेमध्ये मिनी मंत्रालय संग्राम समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी दिली. यावेळी पत्रपरिषदेमध्ये रामा इंगळे, नाना कव्हर आदींची उपस्थिती होती.
*जि.प. शाळेच्या परिपाठात ह्यवाकुडकरांचीह्ण कविता
राज्यामध्ये सातत्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी बांधवांना धीर देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टिकोणातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये परिपाठामधून प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर यांनी लिहिलेली ह्यजहर खाऊ नकाह्ण ही कविता विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतल्या जाण्याचा ठराव वाशिम जिल्हा परिषदेने २0 डिसेंबर रोजी घेतल्याची माहिती आज २५ डिसेंबर रोजी पार पडलेल्या पत्रपरिषदेमध्ये वाकुडकर यांनी दिली.