शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

आदीवासी शेतक-यांना आधुनिक कृषी प्रक्रिया विकासाचे धडे !

By admin | Updated: October 10, 2014 00:25 IST

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात स्वतंत्र प्रशिक्षण वर्ग.

अकोला : विदर्भातील आदीवासी शेतकर्‍यांमधून उद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी त्यांना आधुनिक कृषी प्रक्रीया तंत्रज्ञानाचे धडे देण्यात येत असून, याकरीता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात स्वतंत्र प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेंतर्गत (आयसीएआर) अखिल भारतीय समन्वयीत प्रकल्प कापणी पश्‍चात तंत्रज्ञान विभागाच्या उपयोजनेतून शेतमाल प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातंर्गत आदीवासी शेतकर्‍यांना आधुनिक कृषी प्रक्रिया तंत्रज्ञान प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये उद्यमशिलता, उद्योजक निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. दर्‍याखोर्‍यात राहणार्‍या या शेतकर्‍यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहे त. यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने अखिल भारतीय समन्वयीत प्रकल्प, कापणी पश्‍चात तंत्रज्ञान विभागाला तीन लाखाचा निधी उपलब्ध करू न दिला आहे. आदिवासी शेतकर्‍यांना प्रक्रिया उद्योग तंत्रज्ञान देण्यासाठी आठ प्रशिक्षण वर्ग आणि प्रात्यक्षिक व जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण कृषी विद्यापीठाच्या अकोला मुख्यालयी देण्यात येणार असून, त्यासाठी या शेतकर्‍यांना प्रवासभाडे आदी खर्च दिला जाणार आहे. दोनशे ते अडीचशे शेतकर्‍यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. या अगोदर कापणी पश्‍चात तंत्रज्ञान विभागाने काही आदीवासी शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले असून, काही शेतकर्‍यांनी शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग आदीवासी भागात सुरू केला आहे. हे शेतकरी या प्रशिक्षणवर्गात शेतकर्‍यांना प्रोत्साहन देणार आहेत.या प्रशिक्षण वर्गातून आदीवासी शेतकर्‍यांमध्ये प्रक्रिया उद्योगासह, आत्मविश्‍वास निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. पहिल्या आदीवासी प्रशिक्षण शिबिराला बुधवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्याहस्ते सुरू वात करण्यात आली. एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.आदीवासी शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी आयसीएआरने निधी उपलब्ध करू न दिला असून, या शेतकर्‍यांना उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येत आहे. यापूर्वी कृषी विद्यापीठाने आदीवासी शे तकर्‍यांना प्रशिक्षण देऊन उद्योजक निर्माण केले असल्याचे डॉ.पंदेकृविचे संशोधन अभियंता डॉ. प्रदिप बोरकर यांनी सांगीतले.