वाशिम जिह्यात कुष्ठरोग जनजागरण अभियान; १३ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 03:03 PM2018-01-31T15:03:31+5:302018-01-31T15:05:02+5:30

वाशिम: आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक कार्यालय वाशिमच्यावतीने जिल्ह्यात ‘स्पर्श’ हे कुष्ठरोग जनजागरण अभियान राबविण्यात येत आहे.

Leprosy Campaign in Washim District | वाशिम जिह्यात कुष्ठरोग जनजागरण अभियान; १३ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम

वाशिम जिह्यात कुष्ठरोग जनजागरण अभियान; १३ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देया अंतर्गत ३० जानेवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हाभरात करण्यात येत आहे. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ३० जानेवारी रोजी वाशिम शहरात सकाळी ९ वाजता विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली.आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉ. अश्निन हाके यांनी कु ष्ठरोगाविषयी मार्गदर्शन केले. 

वाशिम: आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक कार्यालय वाशिमच्यावतीने जिल्ह्यात ‘स्पर्श’ हे कुष्ठरोग जनजागरण अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ३० जानेवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हाभरात करण्यात येत असून, येत्या १३ फेब्रुवारीपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.

कुष्ठरोगाविषयी सर्व जनतेला माहिती व्हावी व देश कुष्ठरोगमूक्त व्हावा या दृष्टीकोणातून पंतप्रधान प्रगती योजनेंतर्गत जिल्ह्यात  ‘स्पर्श’ या नावाने राबविण्यात येत असलेल्या कुष्ठरोग जनजागरण अभियानांतर्गत ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करून आोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत कुष्ठरोगाविषयी माहिती देणे, गावप्रमुख, सरपांंचे कुष्ठरोगावर आधारीत भाषण, ग्रामसभेत उपस्थित गावकºयांची प्रार्थना, शालेय विद्यार्थिनीकडून कुष्ठरोग संदेश वाचन, शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी इत्यादि कार्यक्रम गावपातळीवर घेण्यात येत आहेत. त्याशिवाय शालेय पातळीवर विद्यार्थ्यांसाठी कुष्ठरोगावर आधारीत प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ३० जानेवारी रोजी वाशिम शहरात सकाळी ९ वाजता विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीत रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय आणि जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या प्रभातफेरीत विद्यार्थ्यांनी कुष्ठरोग जनजागरणविषयी म्हणी, उद्घोषणा देत जनजागरण केले, तसेच कुष्ठरोगाविषयीचा माहितीच्या देखावा फलकासह हस्तपत्रिका वाटून जनजागरण केले. या प्रभातफेरीचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जनार्दन जांभरूणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मेहकरकर उपस्थित होते. आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉ. अश्निन हाके यांनी कु ष्ठरोगाविषयी मार्गदर्शन केले.  यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जिरोनकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. हेडाऊ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या या कार्यक्र माच्या यशस्वीतेसाठी कुष्ठरोग तंत्रज्ञ डॉ. किशोर कºहाडे, अवैद्यकीय पर्यवेक्षक ए. एस. लोणारे, एन. एन. बढे, अवैद्यकीय सहाय्यक जे. आर. ठाकरे, सांख्यिकी सहाय्यक बी. के. शेंडगे, नंदलाल प्यारे व  जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कायालयातील  कर्मचाºयांनी सहकार्य केले. 

Web Title: Leprosy Campaign in Washim District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम