‘बी स्मार्ट इट स्मार्ट’ विषयावर व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:45 IST2021-08-28T04:45:28+5:302021-08-28T04:45:28+5:30

बदललेल्या जीवनशैलीमध्ये कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस आहार ...

Lecture on ‘Be Smart It Smart’ | ‘बी स्मार्ट इट स्मार्ट’ विषयावर व्याख्यान

‘बी स्मार्ट इट स्मार्ट’ विषयावर व्याख्यान

बदललेल्या जीवनशैलीमध्ये कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. या परिस्थितीत नेमका आहार कसा असावा, याबाबत विस्तृत माहिती असणे महत्त्वाचे ठरते. या अनुषंगाने आयोजित व्याख्यानात विभागप्रमुख सुक्ष्म जीवशास्त्र विभाग डॉ. रचना पचोरी यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशांत चिमणे हाेते. त्यांनीसुध्दा आपले विचार मांडले. सध्याच्या कोविड परिस्थितीत प्रत्येकाने आपले शारीरिक स्वास्थ्य टिकविण्याकरिता आहाराबाबतचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. आहारात काय खावे, काय खाऊ नये, केव्हा खावे, याबद्दलही आता सर्वांनी जागरूक राहाणे गरजेचे आहे. आपल्यासोबतच आपल्या कुटुंबाचीसुध्दा आहारविषयक देखरेख करणे अगत्याचे आहे, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे आयोजन व संचालन प्रा. ललिता दाभाडे यांनी केले. प्रा. भाग्यश्री धुमाळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाकरिता प्रा. संजय इढोळे, डॉ. सागर सोनी, महादेव सोमाणी, मदन पवार, राहुल पांडे, जितेश अग्रवाल, शैलेष घोडके तसेच विधी महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी आपला सहभाग ऑनलाईन नोंदविला.

Web Title: Lecture on ‘Be Smart It Smart’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.