आज महिला आरक्षण सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:28 IST2021-02-05T09:28:11+5:302021-02-05T09:28:11+5:30
सन २०२० ते २०२५ या काळात जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपून निवडणुकीद्वारे नव्याने ग्रामपंचायतींचे कारभारी ठरतील. दरम्यान, ...

आज महिला आरक्षण सोडत
सन २०२० ते २०२५ या काळात जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपून निवडणुकीद्वारे नव्याने ग्रामपंचायतींचे कारभारी ठरतील. दरम्यान, जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट ते डिसेंबर, २०२० दरम्यान संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी निवडणूक झाली. १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाल्यानंतर सर्वांचे लक्ष सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले होते. या वर्षी आरक्षण सोडत प्रक्रियेत ग्रामविकास विभागाने बदल केले आहेत. निवडणुकीपूर्वी सरपंचपदासाठी काढण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करून २ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरावर आरक्षण सोडत काढण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव असल्याने, महिला सरपंचपदासाठी ४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. सरपंचपदाचे आरक्षण महिलांसाठी राखीव निघणार की नाही, याकडे राजकीय क्षेत्रासह इच्छुकांचे लक्ष लागून आहे.