२ फेब्रुवारीला तालुकास्तरावर सरपंचपदाची आरक्षण सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:30 IST2021-02-05T09:30:25+5:302021-02-05T09:30:25+5:30
वाशिम : जिल्ह्यातील सन २०२०-२०२५ दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, संबंधित ...

२ फेब्रुवारीला तालुकास्तरावर सरपंचपदाची आरक्षण सोडत
वाशिम : जिल्ह्यातील सन २०२०-२०२५ दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, संबंधित तालुकास्तरावर २ फेब्रुवारी २०२१ रोजी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक संपल्यानंतर, सरपंचपदासाठी फिल्डिंग लावली जात आहे. सरपंचपदासाठी आरक्षण सोडत कधी जाहीर होणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून हाेते. सन २०२०-२०२५ दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २५ जानेवारी रोजी जाहीर केला. यामध्ये नुकत्याच निवडणुका झालेल्या १६३ ग्रामपंचायतींचादेखील समावेश आहे. जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट ते डिसेंबर २०२० दरम्यान संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी निवडणूक झाली. १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाल्यानंतर सर्वांचे लक्ष सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले होते. आता तालुकास्तरावर २ फेब्रुवारी रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. महिला आरक्षण सोडत ४ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरावर काढण्यात येईल. आरक्षण सोडतीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
००००
४ फेब्रुवारी रोजी महिला आरक्षण सोडत
ग्राम पंचायत निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी ५० टक्के महिला विराजमान होतील. इच्छूकांनी यासाठी फिल्डिंगही लावली आहे. महिला आरक्षण सोडतीसाठी ४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आरक्षण सोडत होणार आहे. इच्छुकांनी या आरक्षण सोडतीस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले.
०००
निवडणूक निकालानंतर आता सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. २ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरावर तर ४ फेब्रुवारी रोजी महिला आरक्षण सोडत जिल्हास्तरावर काढण्यात येइल.
- सुनील विंचनकर
उपजिल्हाधिकारी (महसूल) वाशिम
००
अशा आहेत ग्रामपंचायती
तालुका ग्रामपंचायती
वाशिम २४
रिसोड ३४
मालेगाव ३०
कारंजा २८
मानोरा २२
मं.पीर २५
एकूण १६३