पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनधून पाणी गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:42 IST2021-04-27T04:42:41+5:302021-04-27T04:42:41+5:30
मानोरा ते दिग्रस रोडचे काम करताना जलवाहिनी फुटली होती, ती दुरुस्ती केली. मात्र काम व्यवस्थित केले नाही. त्यामुळे वारंवार ...

पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनधून पाणी गळती
मानोरा ते दिग्रस रोडचे काम करताना जलवाहिनी फुटली होती, ती दुरुस्ती केली. मात्र काम व्यवस्थित केले नाही. त्यामुळे वारंवार त्याच ठिकाणी जलवाहिनी फुटते. परिणामी पाणीपुरवठा बंद होतो. याबाबत नगरपंचायतने रस्ते विभागाशी पत्रव्यवहार करूनदेखील आजवर त्यांनी कुठल्याच प्रकारची कार्यवाही केलेली नाही. वारंवार पाइपलाइन फुटत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. उन्हाळ्यामध्ये पाणी मिळत नसल्याने नागरिकांत असंतोष निर्माण होत आहे.
पाइपलाइनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, याकडे रस्ते विभागाचे दुर्लक्ष आहे. जलवाहिनी तात्काळ दुरुस्त करून लवकरात लवकर मनोरा येथे पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवावा, अशी शहरवासीयांची आहे.
कोट
जलवाहिनी वारंवार नादुरुस्त होत असल्याने शहराला पाणीपुरवठा होत नाही. परिणामी नागरिकांत असंतोष निर्माण होतो. आम्ही अनेकदा रस्ते बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला. प्रत्यक्ष बोललो आहे. एकदाचे काम व्यवस्थित केले पाहिजे, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही.
नीलेश गायकवाड, मुख्याधिकारी, नगरपंचायत, मानोरा