वाशिम शहरात मंजुर पथदिवे कामास प्रारंभ

By Admin | Updated: May 22, 2014 23:37 IST2014-05-22T20:56:20+5:302014-05-22T23:37:50+5:30

जिल्हा सामान्य रूग्णालयासमोर प्रकाश

Launch of approved road work in Washim city | वाशिम शहरात मंजुर पथदिवे कामास प्रारंभ

वाशिम शहरात मंजुर पथदिवे कामास प्रारंभ

वाशिम : शहरातील बर्‍याच भागात पथदिवे नसल्याने होत असलेल्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी नगर परिषदेच्यावतिने ७३७ पथदिवे मंजुर केले होते त्यामधील पथदिवे लावण्याच्या कामास प्रारंभ झाला असून जिल्हा सामान्य रूग्णालय ते डॉ. बी.बी. देशमुख यांच्या हॉस्पिटलपर्यंत पथदिवे लावण्यात आले आहेत.

या पथदिव्यांमुळे या रस्त्यावर प्रकाश निर्माण झाला आहे. वाशिम नगर परिषद क्षेत्रांअंतर्गत ज्या भागात पथदिवे नाहीत अशा बहुतांश भागात एकूण ७३७ नवीन पथदिवे लावणे, त्याकरिता जुन्या ६१३ विद्युत खांबावर पोल वायरिंग ओढणे तसेच १२४ नवीन विजेचे खांब उभारुन त्यावर वायरिंग ओढणे या कामाकरिता तीन वेगवेगळया निविदा मंजूर करुन सदर कामास सुरुवात करण्यात आली असून प्रत्यक्ष कामास सुरूवात झाल्याने नागरिकांची पथदिव्यांची प्रतिक्षा लवकरच संपुष्टात येणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. पथदिव्याअभावी नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत होता. या कामास सुरूवात झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून लवकरात लवकर हे पथदिवे लावण्यात यावे अशी अपेक्षा नागरिकांत व्यक्त केल्या जात आहे. प्रभाग क्रमांक एक पासून या पथदिव्यांच्या कामास सुरूवात होण्याकरीता शिक्षण सभापती भावनदास जिवणानी, नगरसेवक प्रविण सोमाणी, नगरसेवक लताबाई उल्हेमाले, गौतम भालेराव यांनी परिङ्म्रम घेतले.

Web Title: Launch of approved road work in Washim city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.