शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

मानोरा तालुक्यात खरीप हंगामाची कामे अंतिम टप्प्यात

By admin | Updated: June 21, 2014 00:34 IST

शेतकर्‍यांना पाण्याची प्रतीक्षा: आर्थिक जुळवाजुळव सुरू

मानोरा : लग्नसराई शेवटच्या टप्प्यात असून उन्हाळा संपत आल्याने तोंडावर आलेल्या खरीप हंगामाच्या दृष्टीने खरीप हंगामाच्या तयारीची शेती कामे अंतिम टप्प्यात सुरू आहेत.शेती पावसाळ्याअगोदर पेरणीकरिता तयार व्हावी म्हणून तालुक्यात नांगरणी, कचरा वेचणे, बी-बियाणे, अवजारे यांची जुळवाजुळव करण्यात शेतकरी गुंतले आहेत.तालुक्यात सिंचन प्रकल्पांची संख्या अत्यल्प असल्यामुळे शेतकर्‍यांना निसर्गाच्या भरवशावर राहूनच आपली शेती करावी लागते. उडीद, मूग, सोयाबीन, कपाशी व तूर ही तालुक्यातील शेतकर्‍यांची प्रमुख पीके असून या दृष्टीने बहुतांश शेतकर्‍याकरिता खरीप हंगाम हा अतिशय महत्वाचा आहे. खरीपातील पिकांच्या भरवशावर अनेक शेतकर्‍यांचे वर्षाचे आर्थिक व्यवहाराचे गणित अवलंबून असते. त्यामुळे बळीराजा या दृष्टीने कामाला लागला आहे.पूर्वी असलेली पारंपरिक शेती करण्याची पद्धत बंद झाली असून नांगरणी व इतर कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने यंत्राने करण्याकडे शेतकरी वळला आहे. बैलांची कमतरता व घाम गाळून काम करण्याची पहिल्यासारखी शेतमजुरांची मनस्थिती न राहिल्याने यंत्रणाच्या सहाय्याने सर्व कामे उरकून घेण्यात शेतकरी मग्न आहे. आजमितीला सालदार व्यवस्था संपुष्टात आली असून रोजंदारीनेही कोणी कामाला यायला तयार नसल्यामुळे जास्तीत जास्त करुन यंत्रांवरच अवलंबून राहण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.