शिरपूरात हैदोस घालणारे पिसाळलेले माकड अखेर चवथ्या दिवशी जेरबंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 16:40 IST2018-01-25T16:33:11+5:302018-01-25T16:40:43+5:30
शिरपूर जैन (वाशिम) : गत तीन दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या वनविभागाने अखेर चवथ्या दिवशी २५ जानेवारी रोजी पिसाळलेल्या त्या माकडाला शिरपूर गावातून जेरबंद केले.

शिरपूरात हैदोस घालणारे पिसाळलेले माकड अखेर चवथ्या दिवशी जेरबंद !
शिरपूर जैन (वाशिम) : गत तीन दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या वनविभागाने अखेर चवथ्या दिवशी २५ जानेवारी रोजी पिसाळलेल्या त्या माकडाला शिरपूर गावातून जेरबंद केले.
गत आठवड्यापासून शिरपूर येथे एका पिसाळलेल्या माकडाने हैदोस घातला होता. गत तीन दिवसांत तीन जणांना या माकडाने चावा घेऊन जखमी केले होते. या माकडाला पकडण्यासाठी गत तीन दिवसांपासून वनविभागाची चमू शर्थीचे प्रयत्न करीत होती. २५ जानेवारी रोजी सकाळपासूनच वनविभागाची चमू आवश्यक त्या शस्त्र व सापळ्यासह शिरपुरात दाखल झाली होती. माकड शोधल्यानंतर त्याला पकडण्यासाठी या चमूने शर्थीचे प्रयत्न केले. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास माकडाला जेरबंद करण्यात वनविभागाच्या चमूला यश मिळाले. आता या माकडाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहे.